बुलडाणा,
वाईट टाळा चांगले करा,मन शुद्ध ठेवा, साधेपणा आणि नैतिकता जपा. ज्याला मन समजलं, त्याला माणूस समजला, म्हणून बौद्ध धर्म हा मनापासून मनापर्यंत जाणारा महामार्ग आहे,असे मत पुज्यनिय प्रा. डॉ. भदंत कौण्डिण्य यांनी व्यक्त केले. दि १ मे रोजी सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथील अशोक वाटिका च्या भव्य प्रांगणात आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या त्रिविध पावनी वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्त बोलत होते.
यावेळी बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधीक्षक, निलेश तांबे, आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, नाशिक,स्वप्नील साबळे,यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि यशसिध्दी सैनिक सेवा संघाच्या महार रेजिमेंट च्या सैनिकांची व रमाईच्या लेकी ग्रुप पंचशील धम्म यांनी ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर भंते प्रा डॉ भदंत कौण्डिण्य यांनी त्रिशरण पंचशील आणि बुध्द वंदना घेऊन संपूर्ण अशोक वाटिकेला मंत्रमुग्ध केले. यावेळी स्वागत उपस्थित मान्यवरांना संविधान प्रत भेट देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ आराख यांनी करुन उपस्थित मान्यवरांचा अल्प परिचय करून दिला.
यानंतर प्रा डॉ भदंत कौण्डिण्य यांनी बुध्दाचा मध्यम मार्ग हा सर्वोत्तम जीवन मार्ग आहे.समाधान हाच संतोष आहे.बुध्दाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे वैशाखी पौर्णिमा याच दिवशी झाले.हा योगायोगा आपण समजून घेतला पाहिजेत.यासोबतच त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मनातील नकारात्मक विचार दूर करुन मन नेहमी जागृत ठेवण्यावर भर दिला.बुध्दांचे सामर्थ्य हे तलवारी वर नसून ते प्रेमावर आधारित आहे आणि म्हणूनच ते जगावर राज्य करतात.असे सांगून भदंत कौण्डिण्य यांनी पुढे सांगितले की त्यामुळे बुद्धांचे तत्त्वज्ञान हे एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरते. यानंतर गुलाब खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,व स्वप्निल साबळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता फराळ व खिरदान वाटप करुन करण्यात आली.या कार्यक्रमासाठी बुलडाणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध वृत्तपत्राताचे जिल्हा प्रतिनिधी व पत्रकार, इलेट्रॉनिक मिडिया चे प्रतिनिधी व बुलडाणा अर्बन संस्थेचे कर्मचारी व सहकार विद्या मंदिर चे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.