उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानापासून सावध रहा : डॉ. वीरेंद्र अस्वार

    दिनांक :02-May-2026
Total Views |
दिग्रस, 
वाढत्या उन्हामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे सतर्क रहा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा उष्णतेशी संबंधित आजार टाळा, असा वैद्यकीय सल्ला येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक Dr. Virendra Aswar डॉ. वीरेंद्र अस्वार यांनी आवाहन केले. सध्या वाढत्या तापमानाने जीवाची लाही लाही होत आहे कधी नव्हे ते या उन्हाळ्याच्या सुरवातीलाच 45 अंश तापमान अनुभवास मिळत आहे, तर उद्यापासून अती उष्णतेचा मे महिना सुरु होत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचा विचार करुन डॉ.विरेंद्र अस्वार यांनी शोसल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सतर्कतेचा इशारा देत दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक काम असेल तरच तेही हलके, सैल आणि सुती कॉटनचे कपडे वापरा ,फिकट रंगाचे कपडे उन्हाचे परावर्तन करतात ,डोके व मान झाकून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
 
 
Virendra Aswar
 
Dr. Virendra Aswar अत्यावश्यक नसतानाही उन्हात फिरण्याने, डोकेदुखी, चक्कर येणे, शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्माघाताचा धोका वाढतो. विशेषतः शेतकरी, मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ अस्वार यांनी सांगितले तहान लागण्याची वाट न पाहता दर तासाला पाणी प्या. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, आणि ओआरएसचा वापर करा. बाहेर पडताना सनग्लासेस गॉगल, टोपी किंवा छत्रीचा वापर करा. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावा. जड, शिळे, आणि जास्त प्रथिनयुक्त अन्न टाळा. ताज्या फळांचे सेवन करा. मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा. उन्हात उभे राहून जास्त कष्टाची कामे टाळा, असेही डॉ. वीरेंद्र अस्वार यांनी सांगितले.