भंडारा,
geetika dhut महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. संपूर्ण राज्यात सर्व पाचही शाखांमध्ये भंडाऱ्याच्या गीतिका श्याम धुत या विद्यार्थिनीने पटकावला. स्थानिक नूतन कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली गीतिका सर्व शाखांमध्ये अव्वल ठरली असून तिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
उज्वल निकालाची परंपरा नूतन कन्या शाळेने यावेळीही कायम ठेवली. एवढेच नव्हे तर यावेळी संपूर्ण राज्यात आघाडी घेण्याचा मानही शाळेने पटकाविला. गीतिका ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून, तिला 600 पैकी 600 गुण मिळाले आहे. यात तिच्या खेळाच्या 12 गुणांचा समावेश आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय अशा पाचही शाखा मिळून ती राज्यात प्रथम असल्याचा दावा शाळेच्या प्राचार्या निलू तिडके यांनी केला आहे. तिच्या या यशामुळे आज भंडारा जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर कोरले गेले आहे.
दहावीपर्यंत जेसीस कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी असलेल्या गीतिकाने दहावीत 96 टक्के गुण मिळविले होते. त्यानंतर तीने नूतन कन्या महाविद्यालय प्रवेश घेतला.geetika dhut कुठल्याही शिकवणीशिवाय नियमित सहा ते सात तास प्रामाणिकपणे अभ्यास करून हे यश मिळविण्याचे गीतिका सांगते सांगते. संपूर्ण शाळा काळात सर्व प्रकारचा सोशल मीडिया, मोबाईल यापासून दूर असल्याचे तिने सांगितले. लक्ष देऊन नियमित केलेला अभ्यास यशापर्यंत नेऊन पोहोचवितो, असे ती म्हणाली.