गावंडे महाविद्यालयाचा दणदणीत निकाल

    दिनांक :02-May-2026
Total Views |
जिल्ह्यात अव्वल स्थान कायम

उमरखेड, 
Gawande College Result गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही बारावीच्या निकालात उत्कृष्ट परंपरा कायम राखत 98 टक्के निकाल नोंदवला आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावतीतर्फे 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या यशामुळे महाविद्यालयाने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
 
 
nikal
 
 
कला शाखेत योगेश्वरी प्रदीप केळापुरे हिने 91.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून प्राजक्ता अनंता काळबांडे हिने 86.33 टक्के गुणांची आघाडी घेतली. विज्ञान शाखेतही 100 टक्के निकाल नोंदवला गेला आहे. श्रेयश दत्तात्रय सुने याने 88 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. एचएससी व्होकेशनल शाखेत जयश्री कुंडलिक मेंडके हिने 76.67 टक्के गुणांसह प्रथम स्थान मिळवले.
 
 
Gawande College Result  विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या महाविद्यालयात प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मर्यादित साधनसामग्री असूनही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. माधव कदम, उपप्राचार्य प्रा. बालाजी लाभशेटवार, पर्यवेक्षक प्रा. जाधव तसेच सर्व शिक्षक व कर्मचाèयांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाचा लौकिक आणखी उंचावला असून, ही बाब जिल्हा व विभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे.