तभा वृत्तसेवा
चंद्रपूर
HSC result Chandrapur महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार,२ मे रोजी जाहीर झाला. त्यात जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ८८.७२ इतकी आहे. गेल्यावर्षी हाच निकाल ८९.१७ टक्के लागला होता. यंदा निकालात थोडी घट झाली असली, तरी यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
HSC result Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २६ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २६ हजार ७५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात एकूण २३ हजार ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ८८.७२ टक्के आहे. त्यातल्या त्यात जिल्ह्यात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. या परीक्षेला एकूण १३ हजार ३८४ विद्यार्थी, तर १३ हजार ३७३ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी ११ हजार ३९१ विद्यार्थी व १२ हजार ३४८ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.१० , तर मुलींची टक्केवारी ९२.३३ टक्के आहे.
HSC result Chandrapur यावर्षी बारावीच्या निकालात पोंभुर्णा तालुक्याने आघाडी घेतली आहे. या तालुक्याचा निकाल ९७.६० टक्के लागला. तर सर्वात कमी निकाल चिमूर तालुक्याचा ६८.३९ टक्के आहे. शाखानिहाय बघितले तर, विज्ञान शाखेत १२ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून १२ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यात मुले ५ हजार ५११ , तर ६ हजार ६५३ मुलींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत मुलांच्या निकालाची टक्केवारी ९७.९१ टक्के, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९८.२४ टक्के इतकी आहे. कला शाखेत ११ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ११ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ४ हजार ५७७ मुले, तर ४ हजार ७४० मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ९ हजार ३१७ आहे. कला शाखेत मुलांच्या निकालाची टक्केवारी ७४.२४, मुलींच्या निकालाची टक्केवारी ८५.३७ इतकी आहे.
HSC result Chandrapur वाणिज्य शाखेत १ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८६.४६ , तर ९२.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. एमसीव्हीसी शाखेत ७७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७६२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यात ४७३ विद्यार्थी आणि १४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ६२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलांच्या निकालाची टक्केवारी ८०.०३ , तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८५.९६ टक्के आहे.
HSC result Chandrapur पोंभुर्णा तालुका आघाडीवर
तालुका टक्केवारी
चंद्रपूर--- ९२.४६
बल्लारपूर-- ९३.३१
भद्रावती --८१.०५
ब्रम्हपुरी---८७.३७
चिमूर-----६८.३९
गोंडपिपरी---९०.३०
कोरपना--- ८७.६२
मूल-----९२.३९
नागभीड---९१.७४
पोंभूर्णा----९७.६०
राजुरा----९४.१६
सावली----८१.४७
सिंदेवाही---८८.३०
वरोडा----८८.९०
जिवती---८६.९२
HSC result Chandrapur शाखानिहाय निकाल
विज्ञान : ९७.०६
कला : ७९.५१
वाणिज्यः ८९.२२
एमसीव्हीसीः ८१.३६