अकोला,
girls win in akola महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी व मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.१४ टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींचीच बाजी निकालात दिसून आली. तर विभागात जिल्हा तिसऱ्या स्थानावर गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे निकालात गतवर्षीपेक्षा सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी १२ हजार ९१० मुले व ११ हजार ८१२ मुली असे एकूण २४ हजार ७२२ विद्यार्थी प्रविष्ठ होते.त्यापैकी ११ हजार १९३ मुले ११ हजार ९३ मुली असे एकूण २२ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९०.१४ टक्के एवढी आहे. मुलींची टक्केवारी ९३.९१ टक्के असून मुलांची टक्केवारी ८६.७० टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी सात टक्क्यांनी अधिक आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेचे ९६.९५ टक्के, वाणिज्य शाखा ९१.५१ टक्के, कला शाखा ७८.४५ टक्के, तर व्होकेशनल शाखा ६४.४९ टक्के लागला आहे.
तालुकानिहाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
तालुका मुले मुली एकूण टक्केवारी
अकोला 4049 4509 8558 91.31%
अकोट 1400 1432 2832 89.25%
तेल्हारा 826 861 1687 93.35%
बा.टाकळी1377 1146 2523 88.77%
बाळापूर 1106 1179 2285 83.36%
पातूर 1589 1162 2751 96.79%
मूर्तीजापूर 846 804 1650 84.83%
एकूण 11193 11093 22286 90.14%
गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
विद्यार्थ्यांना गुण समाधानकारक वाटत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही प्रक्रिया विभागीय मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.girls win in akola विद्यार्थी स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करू शकतात. या प्रक्रियेसाठी ६ मे ते २० मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.