उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
यवतमाळ,
Guardian Minister Sanjay Rathod मागील काही वर्षांमध्ये झालेल्या विकास कामांमुळे जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येत्या काळात ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्रसाठी सर्वांनी आत्मनिर्भर यवतमाळ घडविण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी केले. पोस्टल मैदानात महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळेसह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर भगिनी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
Guardian Minister Sanjay Rathod यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात विविध योजना राबवित आहोत, असे संजय राठोड यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. शेतकèयांना ही मदत वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 30 हजार शेतकèयांना 1500 कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत सध्यस्थितीत 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाला नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार उपाययोजना सुरू आहेत. पशूधनासाठी जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना 2.0, भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा संकल्पनेंतर्गत शेत शोषखड्डा ही योजना राबवत आहोत. या योजनेअंतर्गत जवळपास 3 हजार 500 शेत शोषखड्डे शेतकèयांना करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शासनातर्फे राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती संजय राठोड यांनी दिली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी पोलिस व गृहरक्षक दलाच्या पथसंचलनाचे निरीक्षण करून सलामी दिली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवाटे व शुभांगी वानखेडे यांनी केले.