भोपाळ
High Court न्यायालयात कधी कोणते प्रकरण उभे राहील, याचा नेमच नसतो. याचाच प्रत्यय मध्यप्रदेश उच्च न्यायालयासमोर आलेल्या एका अजब प्रकरणामुळे पुन्हा एकदा आला आहे. अपहरणाच्या आरोपातून सुरू झालेले हे प्रकरण सुनावणी दरम्यान कौटुंबिक वादात बदलले आणि दोन सख्ख्या बहिणींनी एकमेकींच्या नवèयासोबत राहण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली.
High Court हे प्रकरण मध्यप्रदेशात दतिया येथील रहिवासी गिरीजा शंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे समोर आले. त्यांनी आरोप केला होता की, मायाराम नावाच्या व्यक्तीने मेहुणीला आणि तिच्या मुलीला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने पोलिसांना संबंधित महिलेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.
High Court मात्र, सुनावणीदरम्यान महिलेने न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, तिचे अपहरण झाले नाही, तर ती स्वत:च्या इच्छेने मायारामसोबत राहत आहे. तिने आपल्या पतीपासून विभक्त होण्यासाठी आधीच घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचे सांगितले.
High Court या प्रकरणाला आणखी वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा मायारामच्या पत्नीनेही याला विरोध केला नाही. उलट, न्यायालयाला सांगितले की, तिच्या मोठ्या बहिणीला तिच्या पतीसोबत राहायचे असेल तर तिला त्याबाबत कोणतीही हरकत नाही. तसेच तिलाही बहिणीच्या पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले. दोन्ही बहिणींनी न्यायालयात सांगितले की, त्या आपल्या सध्याच्या वैवाहिक आयुष्यात समाधानी नाहीतर आणि परस्पर संमतीने एकमेकींच्या पतीसोबत नवीन आयुष्य सुरू करू इच्छितात. विशेष म्हणजे दोघींनाही मुले आहेत. न्यायालयाने दोन्ही महिला सज्ञान असल्याचे सांगून हे कौटुंबिक प्रकरण आपसात निपटारा करण्यायोग्य असल्याचे म्हटले. तसेच ही याचिका फेटाळून लावली.