लाचलुचपत प्रतिबंधक नवीन इमारतीचे लोकार्पण

    दिनांक :02-May-2026
Total Views |
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती

यवतमाळ, 
Inauguration of new anti-corruption building जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक‘माला आमदार किसन वानखेडे, नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मु‘य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अधीक्षक अभियंता सुषमा बोंद्रे, लाप्रविचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकरसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
 
ACB
 
Inauguration of new anti-corruption building  यावेळी पालकमंत्री संजय राठोड व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या इमारतीचे कौतुक केले. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांमध्ये शासन व विभागाची प्रतिमा निर्माण होण्यासाठी लोकसहभाग, लोकचळवळ व आपुलकी निर्माण झाली पाहिजे. यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा धाक कायम राहिला पाहिजे. जनजागृती झाली पाहिजे. शासकीय विभागाच्या इमारतींसाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी संजय राठोड, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी नवीन इमारतीची पाहणी करून वृक्षारोपण केले.