नवी दिल्ली
India hypersonic missile भारताचे संरक्षण क्षेत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात देशाने महत्त्वपूर्ण प्रगती साधली असल्याचे संकेत मिळाले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत बोलताना भारताच्या हायपरसॉनिक कार्यक्रमाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
कामत यांच्या म्हणण्यानुसार, भारत सध्या हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र आणि हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र या दोन प्रमुख प्रणालींवर काम करत आहे. यापैकी ग्लाइड प्रकाराचे क्षेपणास्त्र विकासाच्या अधिक प्रगत टप्प्यावर असून त्याच्या चाचण्या लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.ते म्हणाले की, हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र स्क्रॅमजेट इंजिनवर आधारित असून ते उड्डाणादरम्यान इंधनाचा वापर करते, तर हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र सुरुवातीचा वेग बूस्टरद्वारे मिळवून नंतर इंधनाशिवाय अत्यंत उच्च वेगाने वातावरणात मार्गक्रमण करते. दोन्ही प्रणालींमध्ये तांत्रिक दृष्ट्या मोठा फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेग्लाइड क्षेपणास्त्राच्या प्रगतीबाबत बोलताना कामत यांनी ते अधिक प्रगत अवस्थेत असून लवकरच त्याची पहिली चाचणी घेण्यात येऊ शकते, असे संकेत दिले. या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, डीआरडीओच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत India hypersonic missile बोलताना कामत यांनी सांगितले की, संस्था अग्नी-६ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या विकासासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अग्नी-६ हे सध्याच्या अग्नी मालिकेपेक्षा अधिक लांब पल्ल्याचे आणि सुधारित क्षमतेचे क्षेपणास्त्र असण्याची अपेक्षा आहे.भारत गेल्या काही वर्षांपासून आपल्या संरक्षण क्षमतांना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, विविध अत्याधुनिक प्रणालींच्या विकासातून देशाची सामरिक ताकद वाढत असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होते.