टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा

हरमनप्रीत कौर कर्णधार, स्मृती मंधाना उपकर्णधार नंदिनी शर्मा, यष्टिरक्षक यास्तिका भाटियाला संधी

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
T20 World Cup इंग्लंड व वेल्समध्ये होणाèया आगामी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताने आपल्या महिला टी-२० संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर या महिला संघाचे नेतृत्व करणार आहे, तर स्मृती मंधाना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप पदार्पण न केलेल्या नंदिनी शर्मा आणि यष्टिरक्षक यास्तिका भाटिया यांचा १५ खेळाडूंच्या या संघात समावेश करण्यात आला आहे.
 
womens 
T20 World Cup प्रतिका रावलला टी-२० विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले असले, तरी तिचा समावेश कसोटी संघात करण्यात आला आहे. १० ते १३ जुलै दरम्यान लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौरला दुखापतीमुळे संघात स्थान मिळवता आले नाही.
T20 World Cup नंदिनी ही एक मध्यमगती गोलंदाज असून तिने महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून १० सामने खेळले असून, त्यामध्ये तिने १७ बळी मिळविले आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातही तिचा समावेश होता.
T20 World Cup विश्वचषकासाठी निवडलेला संघ, त्यापूर्वी यजमान इंग्लंडविरुद्ध २८ मेपासून सुरू होणाèया तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतही सहभागी होईल.
T20 World Cup इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आणि टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), श्री चरणी, यस्तिका भाटिया (दुसरी यष्टिरक्षक), नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
T20 World Cup इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, प्रतिका रावल, ऋचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, हरलीन देओल, रेणुका सिंग, क्रांती गौड, सायली सातघरे, स्नेह राणा.