आयईडी स्फोटाने हादरला कांकेर, ३ जवानांनी दिले बलिदान

    दिनांक :02-May-2026
Total Views |
कांकेर,
Kanker shaken by IED blast छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाची गंभीर घटना समोर आली असून, या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जंगल परिसरात सुरक्षा दलाचे पथक स्फोटक शोधून निष्क्रिय करण्याच्या मोहिमेवर होते. त्यावेळी जमिनीत लपवून ठेवलेला स्फोटक पदार्थ निष्क्रिय करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला.
 
Kanker
 
या स्फोटात निरीक्षक सुखराम वट्टी, शिपाई कृष्णा कोमरा आणि शिपाई संजय गडपाले यांनी घटनास्थळीच प्राण गमावले, तर शिपाई परमानंद कोमरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. Kanker shaken by IED blast ही घटना छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल भागात घडली. विशेष म्हणजे, राज्य प्रशासनाने अलीकडेच नक्षलमुक्तीची घोषणा केल्यानंतर अशा प्रकारचा हा पहिलाच स्फोट ठरला आहे, त्यामुळे या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
बस्तर परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पथक त्या भागात सर्च मोहीम राबवत होते. अलीकडे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ लपवून ठेवले असल्याचे समोर आले होते. Kanker shaken by IED blast आतापर्यंत अशा अनेक स्फोटकांना शोधून सुरक्षितरीत्या निष्क्रिय करण्यात यश आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र केली असून नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवली आहे. जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांच्या बलिदानाची नोंद संपूर्ण देशाने घेतली आहे.