यवतमाळ,
Kimaya Watile शनिवार, २ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात किमया शितल वातीले हिने पैकीच्या पैकी गुण मिळविणारे यश संपादन केले.
Kimaya Watile जगदंबा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी किमया वातीले हिने इंग्रजी, गणित स्टॅटिस्टीक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांमध्ये १०० पैकी १०० तर ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये २०० पैकी २०० असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळवले आहे. किमया ही येथील जगदंबा इंजिनीयरिंग महाविद्यालयाचे सचिव डॉ. शितल व ज्योती वातीले यांची कन्या आहे. किमयाने प्राप्त केलेल्या या घवघवीत यशामुळे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत