कामगारांचे शारीरिक श्रमाकडून तांत्रिक कौशल्याकडे स्थलांतर

    दिनांक :02-May-2026
Total Views |
आधुनिक मशिनरीने कामे सुरू
‘कामगार दिन विशेष’

अभय इंगळे
यवतमाळ : कामगार दिन ज्याला Labor Day ‘श्रमिक दिन’ असेही म्हणतात. दरवर्षी १ मे रोजी जगभरात हा दिवस साजरा जातो. कामगारांचे योगदान, त्यांचे कष्ट आणि कष्टकर्‍यांच्या सन्मानार्थ हा दिवस समर्पित आहे. मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे कामगारांना सुरक्षितता मिळण्याची शक्यता असली तरी, काही क्षेत्रांत नोकरी गमावण्याची भीतीही आहे. या पार्श्वभूमीवर नवीन श्रमसंहिता लागू करणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी होत आहे.
 
 
machin
 
कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दिग्रस शहर परिसरात कामगारांच्या प्रकाश टाकण्याच्या दृष्टिने प्रयत्न केला असता असे निदर्शनास आले की, ऑटोमेशनमुळे काही पारंपारिक नोकर्‍या कमी होत असून कामगारांना नवीन कौशल्ये शिकण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. थोडक्यात, आधुनिक मशिनरीमुळे कामगारांना ‘शारीरिक श्रमाकडून’ ‘मानसिक आणि तांत्रिक कौशल्याकडे’ स्थलांतर करावे लागत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
 
 
Labor Day  कामगारांना ८ तासांची कामाची वेळ, हक्क आणि वागणूक मिळावी यासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण म्हणून हा १ मे हा दिवस पाळला जातो. मात्र ग‘ामीण भागात कामगारांच्या हाती कामच उरले नाही घर बांधकाम, विहीर बांधकाम व शेतातील कामे आधुनिक मशिनरीच्या साह्याने होत असल्याने अनेक कामगार आता हॉटेल, किराणा दुकान व मोठ्या मॉलमध्ये नोकरी करण्याची वेळ ओढवल्याचे दिसून आहे. कामगारांना कायद्याने अनेक मूलभूत अधिकार मिळाले आहेत, ज्यामध्ये किमान वेतन, ८ तासांची कामाची वेळ, सुरक्षित कार्यस्थळ, महिलांसाठी बाळंतपण रजा मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नाही ही ग्रामीण भागातील कामगारांची शोकांतिका आहे.
मजूर कामगार सोसायटी कंत्राटदारांना मोठी करण्यासाठी
शहरात अनेक मोठ्या कंत्राटदारांनी राजकीय वरदहस्ताने मजूर कामगार स्थापित केली मात्र प्रत्यक्षात याचा मजूर वर्गाला काडीचाही फायदा नसून या सोसायटीच्या माध्यमातून मोठ मोठे करोडो रुपयाचे शासकीय कामे घेऊन त्यातून लाखो रुपयांचे कमिशन खाण्याचे उद्योग आज कोणापासून लपून राहिले नाही. शासकीय किंवा निमशासकीय विभागांची कामे उदाहरणार्थ बांधकामे, रस्ते निविदेद्वारे मिळवणे आणि ती मजुरांच्या मदतीने पूर्ण करणे असा मजूर उद्दीष्ट आहे. प्रत्यक्षात मात्र तसे दिसून येत नाही अकुशल कामगारांना, मजुरांना किंवा बेरोजगार अभियंत्यांना कामाच्या संधी उपलब्ध करून देणे.