दुखापतीमुळे लक्ष्य सेनची थॉमस चषकातून माघार

फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत खेळणार नाही

    दिनांक :02-May-2026
Total Views |
हॉर्सेन्स
Thomas Cup प्रतिष्ठेच्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध होणाèया उपांत्य सामन्यात भारताला लक्ष्य सेनच्या सेवेविना खेळावे लागेल. लक्ष्य सेनला दुखापत झाल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. तो सध्या आपल्या उजव्या कोपराच्या सूजेतून सावरत आहे.
 
lakshya sen 
Thomas Cup २४ वर्षीय लक्ष्यने, जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चोऊ टिएन चेनविरुद्धच्या एका तास व 28 मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या लढतीत, दोन मॅच-पॉइंट्स वाचवत १८-२१, २२-२०, २१-१७ असा विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर भारताने उपांत्यपूर्व फेरीत चीन तैपेईवर ३-० असा दणदणीत विजय नोंदविला होता.
Thomas Cup राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील या विजेत्या खेळाडूला, एका तीव्र रॅलीदरम्यान एका फटक्यासाठी झेप घेताना कोपराला दुखापत झाली.
Thomas Cup काल चोऊ टिएन चेनविरुद्धच्या सामन्यात पडल्यामुळे, लक्ष्यच्या खेळणाèया हाताला विशेषतः कोपराच्या भागात सूज आली आहे. तसेच, त्याला पायांवर फोड येण्याच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे, असे भारताचे माजी प्रशिक्षक आणि त्याचे मार्गदर्शक विमल कुमार यांनी सांगितले.
Thomas Cup लक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे, युवा खेळाडू आयुष शेट्टी सलामीचा एकेरी सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस्टो पोपोव्हविरुद्ध खेळेल.
Thomas Cup उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताचे पदक आता निश्चित झाले आहे. देशाने २०२२ मध्ये थॉमस चषक जिंकला होता, तसेच १९५२, १९५५ आणि १९७९ मध्ये कांस्य पदकेही पटकावली होती.