महिला प्रबोधन मंडळात समाजजागृतीपर व्याख्यान उत्साहात

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपूर,
Mahila Prabodhan Mandal महिला प्रबोधन मंडळाच्या वतीने १ मे रोजी समाजसेविका गौरी शर्मा यांचे समाजजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. “धर्मांतरण आणि समाजातील विविध प्रवृत्तींबाबत जागरूकता” या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात सुषमा गुजर यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने झाली. मंचावर मंडळाच्या अध्यक्षा आणि सचिव उपस्थित होते. सूत्रसंचालन वंदना चाकोते यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय मेघा ढोमणे यांनी करून दिला.
 
Mahila Prabodhan Mandal
 
गौरी शर्मा यांनी आपल्या व्याख्यानात समाजात वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबाबत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला. तरुण पिढी कशा प्रकारे चुकीच्या मार्गाकडे वळते आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतात, याबाबत त्यांनी उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. Mahila Prabodhan Mandal समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंका मांडल्या व समाधान करून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी वसुंधरा टोकेकर यांनी आभार प्रदर्शन केले, तर विश्व मंगल सभेच्या सदस्यांनी जयघोष करून कार्यक्रमाची सांगता केली.
सौजन्य: मृदुला पंडित, संपर्क मित्र