महाल दंगलीतील आराेपी फहीम खानला अटक

तहसील पाेलिसांची कारवाई

    दिनांक :02-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
Mahal riot accused गेल्या वर्षी मार्च महिन्यात महाल परिसरात झालेल्या दंगली प्रकरणातील आराेपी फहीम खान याला पाेलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नाेंद असलेल्या पाच प्रकरणांपैकी एका प्रकरणाच्या चाैकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. तहसील पाेलिस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.
 
 
Mahal riot accused
 
17 मार्च राेजी महाल भागात उसळलेल्या दंगलीत माेठ्या प्रमाणात ताेडाेड करण्यात आली हाेती. या घटनेदरम्यान महिला पाेलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन झाल्याचेही समाेर आले हाेते. Mahal riot accused तसेच अनेक पाेलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले हाेते. या संपूर्ण प्रकारामागील मुख्य सूत्रधार म्हणून फहीम खानचे नाव पुढे आल्याने त्याच्याविरुद्ध विविध पाेलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले हाेते.
 
 
फहीम खान याला यापूर्वीही अटक करण्यात आली हाेती तसेच त्याचे घरही पाडण्यात आले हाेते. त्याच्याविरुद्ध गणेशपेठ आणि तहसील पाेलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे नाेंद आहेत. त्यापैकी एका प्रकरणात अद्याप अटक झाली नव्हती. हे प्रकरण आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आले हाेते. Mahal riot accused याच प्रकरणात आता त्याला अटक करण्यात आली आहे. याआधी या प्रकरणात आठ आराेपींसह अलीकडेच दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले हाेते.
 
दाेन आठवड्यांपूर्वीही अटक
सुमारे दाेन आठवड्यांपूर्वी गणेशपेठ पाेलिसांनीही त्याला एका अन्य वादाच्या प्रकरणात अटक केली हाेती. Mahal riot accused सध्या त्याला न्यायालयात हजर करून पाेलिस काेठडीची मागणी करण्याची तयारी सुरू आहे.