नागपूर,
Maharashtra Day उदय नगर येथील बगीच्यात लक्षवेध योगनृत्य परिवाराच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमातेच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील एका कंपनीत कार्यरत असलेले जेना उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश बन, पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर, मधुसूदन मुंडे आणि आयोजक रवींद्र इंकाने यांचीही उपस्थिती लाभली. Maharashtra Day यावेळी शिल्पा हुद्दार यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
कामगार दिनाचे औचित्य साधून परिसरातील चहाविक्रेता रमेश यांचा शाल, पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मेश्राम मॅडम यांनी केले, तर शिल्पा हुद्दार यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. Maharashtra Day कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पा हुद्दार, ढोबळे काकू, अजय चव्हाण, मेघा चव्हाण, मंगला रोडे, कल्याणी येरमे, जीवन राऊत, भुजाडे सर, संजय घाडगे आदींनी परिश्रम घेतले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: श्रीकांत पौनीकर, संपर्क मित्र