निर्मिती विहारमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपूर
Nirmanth Vihar नवीन नरसाळा येथील निर्मिती विहार नागरिक मंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलनीतील खुल्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
Nirmanth Vihar
 
या कार्यक्रमात कॉलनीतील नागरिक, महिला मंडळ तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. Nirmanth Vihar कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहिवासी आणि आयोजकांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले. निर्मिती विहार नागरिक मंडळाच्या वतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, रहिवासी आणि महिला मंडळाचे आभार मानण्यात आले.
सौजन्य: महेंद्र वैद्य, संपर्क मित्र