मुंबई,
maharashtra hsc result 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) १२वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज, २ मे २०२६ (शनिवार) रोजी दुपारी बरोबर १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांची सांख्यिकीय माहिती सकाळी ११ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:
दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात:
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org
- hscresult.mahahsscboard.in
SMS द्वारे निकाल कसा पाहाल?
वेबसाइटवर ट्रॅफिक वाढल्यास सर्व्हर स्लो होऊ शकतो, अशा वेळी विद्यार्थी एसएमएसद्वारे त्वरित निकाल मिळवू शकतात:
१. मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.
२. MHHSC [space] आसन क्रमांक टाइप करा.
३. हा मेसेज ५७७६६ या क्रमांकावर पाठवा.
निकाल कसा डाउनलोड करायचा? (Step-by-Step)
१. वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा आसन क्रमांक (Seat No.) आणि आईचे नाव अचूक भरा.
४. 'View Result' बटणावर क्लिक करा.
५. स्क्रीनवर निकाल दिसताच त्याची प्रिंटआउट घ्या किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करा.
-विद्यार्थी 'DigiLocker' वरूनही आपली डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात.
परीक्षेचा थोडक्यात आढावा:
परीक्षा कालावधी: ११ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६.
निकाल पद्धत: उत्तरपत्रिकांची वेळेत छाननी करून मंडळाने जलदगतीने निकाल तयार केला आहे.
मागील वर्षाचा कल: २०२५ मध्ये राज्याचा एकूण निकाल ९१.८८% लागला होता. यामध्ये मुलींनी (९४.५४%) मुलांपेक्षा (८९.५१%) बाजी मारली होती.
पुनर्परीक्षा :
जे विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, त्यांच्यासाठी बोर्डाकडून तातडीने जुलै-ऑगस्टमध्ये पुनर्परीक्षा घेतली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांना पुढील प्रवेशासाठी संधी मिळेल.
घेता येईल.