मथिशा पथिराना केकेआरकडूनपदार्पण करण्याची शक्यता

    दिनांक :02-May-2026
Total Views |
हैदराबाद
IPL रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हैदराबादमध्ये होणाèया अवे सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) मथिशा पथिरानाला बहुप्रतिक्षित पदार्पणाची संधी देण्याच्या पर्यायांचा विचार केला जात आहे, असे केकेआरचे गोलंदाजी प्रशिक्षक टीम साउदी यांनी सांगितले. श्रीलंकन वेगवान गोलंदाजाने आपल्या मायदेशी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर तो गत दोन आठवड्यांपासून संघासोबत आहे.
 

kkr 
IPL  पथिरानाला गत १६ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान पोटरीला दुखापत झाली होती. त्यानंतर, १ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या घरच्या सामन्यापूर्वी तो संघात दाखल झाला; संघाच्या दुखापतींमुळे कमकुवत झालेल्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाला अत्यंत आवश्यक असलेला बळ देण्यासाठी त्याचे आगमन महत्त्वाचे ठरले होते.
पथिराना संघात दाखल झाल्यापासून केकेआरने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आणखी एक सामना खेळला आहे. फ्रॅन्चायझीला पथिरानाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, परंतु त्याला अद्यापही संघात स्थान मिळालेले नाही.
जर पथिरानाला संघात स्थान द्यायचे असेल, तर संघाला टिम सेफर्ट आणि रोव्हमन पॉवेल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.