मोठ्याने लहान भावाची केली हत्या

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपुरी गेट हद्दीतील घटना
 
अमरावती, 
Murder शेत जमिनीच्या वादातून ६० वर्षीय सख्ख्या भावानेच लहान भावाला जीवाने संपवले तसेच या वादात मध्यस्थी करायला गेलेला तिसरा भाऊ देखील जखमी झाला आहे. हा रक्तरंजीत थरार नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दोघे पसार झाले आहेत.
 
 
mur
 
Murder  मोहमद नाजीम मोहमद लुकमान (५४, रा. पूर्णानगर) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. मृतकाचे नाव मोहमद मकसूद मोहमद लुकमान (५७, रा. नूर नगर, अमरावती) आहे. या प्रकरणात पोलिसांनी मारेकरी अब्दुल तसकीन मोहमद लुकमान (६०, रा. छायानगर, अमरावती) याला अटक केली आहे. या हल्ल्यात मोहम्मद नाजीम हे सुध्दा जखमी झाले आहे. या प्रकरणातील तक्रारदार, मृतक व अब्दुल तसकीन हे तिघे सख्खे भाऊ आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्यामध्ये शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान शुक्रवारी रात्री या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या अब्दुल तसकीनने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने धाकटा भाऊ मकसूद याच्या छातीवर जोरदार वार केले. हा वार इतका वर्मी होता की मकसूद रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा रुग्णालयात नेईस्तोवर मृत्यू झाला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले नाजीम यांच्या कपाळावरही आरोपीने चाकूने वार केला. या घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य मारेकरी अब्दुल तसकीन याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात त्याला साथ देणारे नाहिद काझी उर्फ रेहमान डेंटर आणि सलेकिन अब्दुल सलीम काझी हे सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.