नागपूर विभागाचा वास्तवदर्शी निकाल

    दिनांक :02-May-2026
Total Views |
- विद्यार्थ्यांचा मेहनतीला यशाचा मुकुट

नागपूर, 
12th results out महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागाला यंदा पुन्हा एकदा निराशाजनक चित्र पाहायला मिळाले आहे. एकूण ८८.६७ टक्के निकालासह नागपूर विभाग राज्यात सलग चौथ्या वर्षी आठव्या स्थानावरच राहिला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ३.४५ टक्क्यांनी घट झाली आहे.
 
 
ngp
 
गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०२२-२३ मध्ये ९०.३५ टक्के, २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ९२.१२ टक्के असा स्थिर निकाल होता. मात्र यंदा तो थेट ८८.६७ टक्क्यांवर घसरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा विभागातून १ लाख ५३ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५२ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एकूण १ लाख ३४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असून मुलींचा उत्तीर्ण टक्का ९२.५०, तर मुलांचा ८४.९० इतका आहे.
 
- निकालात घट का झाली?-
विभागीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा राबविण्यात आलेल्या कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकालावर मोठा परिणाम झाला. गोंदिया व वर्धा जिल्ह्यातील दोन केंद्रांवर सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात २४३ विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले असून संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली. त्यामुळे एकूण निकालात घट झाली असल्याची शक्यता विभागीय अध्यक्ष
 
- शाखानिहाय निकाल
  • विज्ञान - ९७.२८ टक्के
  • वाणिज्य - ८४.५३ टक्के
  • व्यवसाय - ८१.१८ टक्के
  • कला - ७५.५९ टक्के
  • आयटीआय - ८४.३० टक्के
विज्ञान शाखेचा निकाल नेहमीप्रमाणे आघाडीवर असताना कला शाखेची कामगिरी चिंताजनक ठरली आहे.
 
-जिल्हानिहाय आढावा
Nagpur: Class 12th results  यंदा नागपूर जिल्ह्याने ९१.६६ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ गोंदिया (८९.५९) व चंद्रपूर (८८.७२) हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. वर्धा (८७.५२) जिल्ह्याची घसरण झाली असून गडचिरोली (७९.६३) सर्वात मागे आहे.
 
- जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
  • नागपूर - ५७ हजार ३४०
  • चंद्रपूर - २३ हजार ७३९
  • गोंदिया - १६ हजार १८४
  • भंडारा - १३ हजार ९२७
  • वर्धा - १३ हजार ५८५
  • गडचिरोली - ९ हजार ९३१
  • एकूण - १ लाख ३४ हजार ९८८
 
निकालातील घसरण ही केवळ शैक्षणिक गुणवत्तेतील कमीपणामुळे नसून कठोर परीक्षा पद्धती व कॉपीविरोधी कारवाई यांचा थेट परिणाम असल्याचे दिसून येते. मुलींची सातत्यपूर्ण आघाडी कायम असताना मुलांच्या निकालात झालेली घट विशेष लक्षवेधी आहे. तसेच ग्रामीण व मागास भागातील जिल्ह्यांमध्ये अजूनही गुणवत्तेचा प्रश्न कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट होते.12th results out नागपूर विभागाने आगामी वर्षात निकाल सुधारण्यासाठी अभ्यासक्रम, मार्गदर्शन व मूल्यमापन प्रक्रियेत अधिक प्रभावी बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
 
 कॉपीविरोधात शिक्षण मंडळाची मोठी कारवाई
उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील कोदुर्ली येथील माउली कनिष्ठ महाविद्यालयात १२५ तर, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील जे. डी. चौधरी विद्यालयात ११८ विद्यार्थ्यांच्या जीवशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये समान उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले. सखोल चौकशी दरम्यान सामूहिक कॉपी झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात संबंधित सर्व विद्यार्थ्यांना त्या विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले असून दोन्ही परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी सांगितले की, या गैरप्रकारात सहभागी शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संस्थांवरही कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील बोमलवार कनिष्ठ महाविद्यालयात भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत ४२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. त्यांनाही अनुत्तीर्ण करण्यात आले असून त्या केंद्रावरही कारवाईचा प्रस्ताव आहे.