उद्या 'नीट' ची परीक्षा:६ हजार ७६२ विद्यार्थी प्रविष्ट

    दिनांक :02-May-2026
Total Views |
जिल्ह्यातील १८ केंद्र निश्चित

अकोला :
NEET exam वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी युजी नीट २०२६ ही परीक्षा रविवार,३ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांना १.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. अकोला, मुर्तीजापुर, पातुर व बार्शीटाकळी या शहरात एकूण १८ केंद्र निश्चित करण्यात आली असून ६ हजार ७६२ उमेदवार या परीक्षेला प्रविष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
 
neet
 
NEET exam  राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत नीट २०२६ ही परीक्षा रविवार ३ मे रोजी होणार आहे. प्रश्नपत्रिका आणणे, वाहतूक आदी आवश्यक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींना शिस्तबद्ध प्रवेश द्यावा इतर व्यक्ती, माध्यमे तसेच परीक्षा प्रक्रियेची थेट संबंध नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर उमेदवारांची तपासणी नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणी होणार आहे. याशिवाय परीक्षार्थींना ड्रेस कोड निश्चित करण्यात आले आहेत.परीक्षा समन्वयक म्हणून जवाहर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य डी.पी तायडे व न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य एम.एच मुंशी हे काम पाहणार आहेत.