नागपूर,
jungle safari उन्हाळयातील सुट्यांमुळे बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिउद्यानात पर्यटकांची गर्दी झाली आहे. सकाळच्या वेळी सफारीसाठी रांगा लागलेल्या दिसून येतात. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बसची सोय करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या बसेसच्या संख्येत मोठी कपात केल्याने पर्यटकांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. यापूर्वी उद्यानात ऑनलाईन नोंदणी करणार्या पर्यटकांसाठी दररोज बसेस होत्या. आता ही संख्या केवळ ७ बसेसवर आली आहे. त्यामुळे पूर्वी दर अर्ध्या तासाला मिळणारी बस आता तासाला केवळ एकच उपलब्ध आहे. त्यामुळे आगाऊ बुकिंग करूनही पर्यटकांना प्रतिक्षेत उभे राहावे लागते. आशियातील सर्वांत मोठ्या अशा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात सध्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या संख्येत कपात केल्याने पर्यटकांच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे.
विशेषतः सुट्ट्यांमध्ये, अनेकदा बसेस कमी पडत असल्याने गैरसोयींचा सामना करावा लागतो.jungle safari गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिउद्यानात सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली असून अनेकवेळा ‘हाऊसफुल्ल’ ची स्थिती निर्माण होत असते. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात वाघ, बिबट्या, अस्वल आणि तृणभक्षी वातानुकूलित बसेस उपलब्ध आहेत.