वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी कुलर लावण्याचे आदेश

वस्तीगृहासह हजारो विद्यार्थिनींना दिलासा

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपूर,
Order to install coolers विदर्भातील रणरणत्या आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील शासकीय वस्तीगृहांसाठी तातडीने ६०० कुलरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे बेसा येथील शासकीय वस्तीगृहासह नागपुरातील हजारो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वत्र मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयाचे स्वागत होत आहे.बेसा, नागपूर येथील १ हजार मुलींच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींना उन्हामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. वस्तीगृहाच्या जुन्या नियमांनुसार कुलर लावण्यासंदर्भात नियम नसल्याने वारंवार मागणी केली असता अधिकारी नियम नसल्याने कुलर लावण्यास नकार देत होते.
 
 
coolers
 
त्यामुळे सध्याची विदर्भातील उष्णतेची परिस्थिती बघता वस्तीगृहातील अनेक मुलींना उष्णतेमुळे त्वचेचे आजार (इन्फेक्शन) झाले. सर्व विद्यार्थिनी बाहेरगावचे असल्याने व परीक्षा असल्याकारणाने विद्यार्थिनींना नाईलाजाने वस्तीगृहामध्येच लागत असल्याने विद्यार्थिनींना उष्णतेत रहावे लागत आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वसतिगृहातील १०० विद्यार्थिनींनी स्वाक्षरी केलेले निवेदन भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात आणि नगरसेवक रितेश गावंडे माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवले गेले.निवेदनातील गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव आशा पठाण यांना व समाज कल्याण तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. Order to install coolers विदर्भाचे तापमान विचारात घेता, वस्तीगृहातील जुन्या नियमावलीत शिथिलता आणून नागपूरमधील वस्तीगृहांसाठी तत्काळ ६०० कुलर व विदर्भातील वसतिगृहात उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.