नुकसान भरपाईची मागणी
नागपूर,
Police vehicle hits car आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौक दरम्यानच्या मार्गावर शुक्रवारी सायंकाळी एका पोलिस वाहनाने ह्युंडई सॅन्ट्रो (एमपी ०४ सीई ३३३१) या क्रमांकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात कारचालकाचे मोठे नुकसान झाली असल्याची माहिती कारचालक व दिपांशु खिरवडकर यांनी दिली आहे. पोलिस वाहन क्रमांक एमएच ३१ सीव्ही ९६ क्रमांकाच्या टाटा ४१०श्रेणीच्या पोलिस वाहनाने धडक देत दोन वाहनांचे नुकसान केले. यात पोलिसांनी गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे कारण सांगत अंग झटकण्याचा प्रयत्न केला. विज्ञान महाविद्यालय, बालभारती समोरच्या सिग्नलवर हा प्रकार झाला. वाहतूक दिवा लाल असल्याने दिपांशु खिरवडकर एक दोन वाहनचालक थांबले असताना पोलिस वाहनाने धडक मारली. यामुळे कारच्या मागे असलेल्या टाटा हॅरिअर वाहनाचे सुध्दा नुकसान झाले.
Police vehicle hits car ह्युंडई सॅन्ट्रो ही कार आकाशवाणी चौकातून महाराजबाग चौकाच्या दिशेने जात असताना बालभारतीच्या कार्यालयासमोर सिग्नल लाल असल्याने वाहनचालक थांबले होते. दरम्यान अचानक मागून भरधाव वेगाने येणार्या पोलिसांच्या वाहनाने सर्वात पहिले टाटा जोरदार धडक दिली आणि त्यानंतर हॅरिअर खिरवडकर यांच्याय गाडीवर आदळल्याने अपघात झाला. खिरवडकर यांच्या गाडीसमोर एक दुचाकी वाहनही उभे होते. कारची धडक यानंतर दुचाकीला धडकली आणि त्यामुळे कारच्या पुढच्या व मागच्या दोन्ही भागाचेही नुकसान झाले. पोलिसांच्या वाहनाचा वेग ८० किमी प्रतितासपेक्षा अधिक असल्यामुळे सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात झाले.
याप्रकरणी पोलिसांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली.
या अपघातात अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती खिरवडकर यांनी दिली आहे. कारचा विमा असला तरी काच आणि फायबर बॉडीवरील नुकसानीसाठी केवळ ४० टक्के भरपाई दिल्या जाते. म्हणजे उर्वरित ६० टक्के कारचालकाला स्वतःच्या खिशातून करावा लागणार आहे. या संपूर्ण भरपाई पोलिसांनी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.