एक दिवसाची सुटी सांगून गेलेले आयजी तीन महिने परतलेच नाही

    दिनांक :02-May-2026
Total Views |
राजस्थान,
Kaluram Rawat IG राजस्थान पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी काळूराम रावत हे एका दिवसाच्या रजेचा मेसेज पाठवल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साडे तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
 

Kaluram Rawat IG 
मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी काळूराम रावत यांनी आपल्या वरिष्ठांना व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवत ताप आल्यामुळे एका दिवसाची रजा घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू होतील, अशी अपेक्षा होती; मात्र ते परतलेच नाहीत. सुरुवातीला काही दिवस विभागाने प्रतीक्षा केली, परंतु त्यांच्याशी कोणताही संपर्क साधता न आल्याने प्रकरण गंभीर बनले.
दरम्यानच्या Kaluram Rawat IG  काळात रावत यांची पदोन्नती होऊन त्यांची आयजीपदी नियुक्ती करण्यात आली तसेच त्यांची बदलीही करण्यात आली होती. मात्र, नव्या पदावरही त्यांनी हजेरी लावली नाही. इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता दीर्घकाळ अनुपस्थित राहणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जात असून यामुळे प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रावत यांचा मोबाईल फोन सतत बंद येत असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना ‘रिकॉल नोटीस’ही बजावली आहे; मात्र त्यालाही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, त्यांच्या बेपत्ता होण्यामागे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काळूराम रावत हे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागासह विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिलेले अनुभवी अधिकारी मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. अशा अधिकाऱ्याचे अचानक बेपत्ता होणे ही पोलिस यंत्रणेसाठी गंभीर बाब ठरत असून त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणामुळे राजस्थान पोलिस दलातच नव्हे तर प्रशासकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली असून, लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.