राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्यावर गुन्हा दाखल

    दिनांक :02-May-2026
Total Views |
पंजाब
Sandeep Pathak आम आदमी पक्षातून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाणारे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्याविरोधात पंजाबमधील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही एफआयआर गैरजामिनपात्र कलमांखाली नोंदवण्यात आल्या असून, यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Rajya Sabha MP Sandeep Pathak, 
या घडामोडीनंतर संदीप पाठक दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानातून तातडीने बाहेर पडताना दिसले. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचे पथक पोहोचल्याचेही वृत्त आहे. तिलक मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि काही पोलिस कर्मचारी त्यांच्या घराबाहेर उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर ते मागील दरवाजातून वाहनाने तातडीने निघून गेल्याचे सांगितले जाते, त्या वेळी त्यांच्या हातात सूटकेस असल्याचेही दिसून आले.
या पार्श्वभूमीवर Sandeep Pathak  संदीप पाठक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी कोणत्याही FIRची माहिती नसल्याचे स्पष्ट करत, पोलिसांकडून आपल्याला अधिकृतपणे काहीही कळविण्यात आले नसल्याचे सांगितले. “मी माझे संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे देशसेवेत घालवले आहे. भारत कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे. मी कधीही देशाशी विश्वासघात करणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.त्यांनी पुढे प्रतिक्रिया देताना, आपल्या विरोधात सुरू असलेली कोणतीही कारवाई ही काही लोकांच्या भीतीचे लक्षण असल्याचे सांगितले. यापुढे या विषयावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले आहे.दरम्यान, राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चर्चा सुरू झाली आहे. काही अहवालांनुसार, आम आदमी पक्षातील काही माजी खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र या घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.पंजाबमधील दोन जिल्ह्यांमध्ये दाखल झालेल्या FIR आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे संदीप पाठक यांच्या भोवती कायदेशीर आणि राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास आणि अधिकृत पोलिस निवेदन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.