आष्टीत धावत्या ट्रकला आग; गृहरक्षक दलाचे सैनिक आले धाऊन

    दिनांक :02-May-2026
Total Views |
तळेगाव (शा. पंत.), 
Running truck fire मध्यप्रदेशातून आर्वी येथे जेणार्‍या बारदाना बंडल असलेल्या ट्रकने आष्टी बसस्थानकापुढे पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी समयसुचकता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना १ मे रोजी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून बारदाना घेऊन आर्वीकडे येत असलेल्या एमपी १३ एच ०४३५ क्रमांकाचा ट्रक आष्टी बस स्थानक परिसरात येत असताना ट्रकला आग लागल्याचे गृह रक्षक दलाचे सैनिक देवेंद्र मोहोड, अश्विन हराळे, दीपक कुरवाडे, रवींद्र ढोक यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकाला ईशारा देत ट्रक बसस्थानक परिसरात थांबवला.
 
 
truck
 
आष्टी तालुयातील तेलाई घाटात लागलेल्या जंगलातील आगीतील चिंगांरी ट्रकमध्ये पडली असावी आणि त्यातून ही आग लागली असावी असा अंदाज व्यत होत आहे. ट्रकमधील बारदाना बंडल हळूहळू पेटत गेले आणि आष्टी बस स्टॅण्ड परिसरात ट्रक आल्यावर त्यातून धूर निघताना दिसला. चालक व मालक दीपक बांद्रे रा. पांढुर्णा मध्यप्रदेश यांनी जीवाची पर्वा न करता आगीत उडी घेऊन पेटलेले बारदाना बाहेर काढले. पाणी मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर चालकाने आपले वाहन बँक ऑफ इंडिया जवळ बाराई नामक वाशिंग सेंटर जवळ ट्रक उभा केला. बाराई नामक दोन्हीही बंधूनी जीवापाड मेहनत घेत आग विझविण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती ठाणेदार जोशी यांना कळतच त्यांनी अग्निशमन यंत्रणा पाठवून पोलिसांना घटनास्थळी पाठवले. पोलिस कर्मचारी सतीश नंदागवळी यांनी जळत्या ट्रकमध्ये उडी घेत आग विझविली.
 
 
Running truck fire ठाणेदार राजेश जोशी, पोलिस शिपाई सतीश नंदा गवळी, गृहरक्षक दलाचे सैनिक देवेंद्र मोहोड, अश्विन हराळे, दीपक कुरवाडे, रवींद्र ढोक यांचे नागरिकांनी कौतुक केले. आपत्ती निवारण प्रशिक्षण घेऊन आलेले चारही गृहरक्षक दलाचे सैनिक १२ दिवस प्रशिक्षण घेऊन नुकतेच आष्टी शहरात दाखलं झाले होते. नेमके त्याच सैनिकांनी संकट समई मोलाची कामगिरी पार पाडली.