समृद्धी महामार्ग ट्रॅव्हल्स ला भिषण आग

    दिनांक :02-May-2026
Total Views |
आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक
सुदैवाने जीवितहानी टळली

प्रतिनिधी भुमराळा देवानंद सानप
 
Travels
 
Samruddhi Highway Travels on fire आज रोजी 5.40 वाजता सुमारास समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर रोडवर चॅनेल नंबर 296 शिवनी पिसा शिवार तालुका लोणार पोलीस स्टेशन मेहकर हद्दीत MH 38 F 3899 ट्रॅव्हल्स ला टायर फुटल्यामुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून सदर ट्रॅव्हल्स मध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवासी होते घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस, पोलीस निरीक्षक इतर अधिकारी पोलीस अंमलदार महामार्ग पोलीस व समृद्धी महामार्गाचे इतर स्टाफ यांचे मदतीने सुरक्षित बाहेर काढले असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही... आग विझवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती