संग्रामपूर ( रविंद्र दांडगे)
HSC result माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या फेब्रु -मार्च मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वी. च्या परीक्षेत संग्रामपूर तालुक्यातून बसलेल्या १ हजार ६१६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून आज दि.२/ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून संग्रामपूर तालुक्यातील तिन्ही शाखेचा निकाल ९३.८१टक्के निकाल लागला आहे..
HSC result ह्या परिक्षेत प्राविण्य श्रेणी मध्ये२७४,ग्रेड१५३८,ग्रेड२५८७, पास ग्रेड ११७ असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले झाले असून यामध्ये गुलाबबाबा ज्युनियर कॉलेज संग्रामपूरच्या सायन्स विभागासह बापूसाहेब विद्यालयाच्या तीन शाळांचा निकाल १००% लागला आहे.
HSC result या मध्ये जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज पातूर्डा ५० पैकी ४५ उत्तीर्ण निकाल ९२ टक्के , नागेश्वर महाराज ज्युनियर कॉलेज वरवट (बकाल) ११० पैकी ९५ उत्तीर्ण ८६.३६ टक्के , खोटेश्वर महाराज विद्यालय एकलारा (बनोदा) ४२ पैकी २७ उत्तीर्ण ६४.२८ टक्के आदिवासी ज्युनियर कॉलेज टूनकी ६२ पैकी ५९ उत्तीर्ण ९५.१६ टक्के , संत गुलाब बाबा ज्युनियर कॉलेज संग्रामपूर ३७५ पैकी ३६४ उत्तीर्ण ९७.०६ टक्के , विक्रमराव देशमुख ज्युनियर कॉलेज निवाणा २३२ पैकी २३२ उत्तीर्ण १०० टक्के , राष्ट्र संत उदय सिंह महाराज ज्युनियर कॉलेज सोनाळा १०८ पैकी ९७ उत्तीर्ण ८९.८१ टक्के ,आर्ट सायन्स ज्युनियर कॉलेज वरवट (बकाल) ११७ पैकी ११६ उत्तीर्ण ९९.१४ टक्के , पुष्पाताई देशमुख ज्युनियर कॉलेज कवठळ १६५ पैकी १६५ उत्तीर्ण निकाल १०० टक्के , स्व.प्रकाश भोंगळ ज्युनियर कॉलेज पातुर्डा ३९ पैकी ३७ उत्तीर्ण ९४.८७ टक्के , असद मदनी ज्युनियर कॉलेज सोनाळा ७७ पैकी ४८ उत्तीर्ण ६२.३३ टक्के , दादाराव इंगळे ज्युनियर कॉलेज वानखेड ६ पैकी ५ उत्तीर्ण निकाल ८३.३३ टक्के ,बापूसाहेब देशमुख ज्युनियर कॉलेज वडगाव (वान) २० पैकी २० उत्तीर्ण निकाल १०० टक्के ,सहकार विद्या मंदिर वरवट (बकाल )१५२ पैकी १४६ उत्तीर्ण ९६.०५ टक्के असा निकाल लागला आहे.
HSC result तालुका मुख्यालय असलेल्या संत गुलाबबाबा विद्यालय व ज्युनियर कॉलेज संग्रामपूरचा सायन्स शाखेचा निकाल १०० टक्के तर वाणिज्य ९८ टक्के आणि कला शाखेचा ९१ टक्के निकाल लागला असून या निकालाचे पालक आणि शिक्षक वर्गातून स्वागत होत आहे.वेदांत गोपाळ धर्माळ ८५.३३ टक्के ऋचा जगदीश चोखट ८२.५५ टक्के कु. रोशनी गजानन धुर्डे ८०.६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून शाळेतील २२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये १९१ विद्यार्थी ग्रेड१ तर १३३ विद्यार्थी ग्रेड२श्रेणी मध्ये आणि १८ विद्यार्थी पास ग्रेड श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. स्वच्छ व नैसर्गिक परिसर भौतिक सुविधांची परिपूर्तता याच बरोबर बारमाही होणारे ठराविक वर्ग या शिवाय बाहेरील शिकवणी वर्गाचे कोणतेही स्तोम येथे नसून शिक्षकांची कार्यकुशलता आणि विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती मुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य अशोक थोटांगे आणि संस्थेचे सचिव गोपाल रहाटे यांनी दिली आहे.