सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा

    दिनांक :02-May-2026
Total Views |
- विज्ञान शाखेत जान्हवी चिचमलकर, निधी कोरे, सुयश बोरकर जिल्ह्यातून प्रथम द्वितीय व तृतीय
- कला शाखेत अनुराग बोरकर जिल्ह्यातून दुसरा

अर्जुनी मोरगाव, 
Saraswati Junior College महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवार २ मे रोजी जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल विज्ञान व कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून जान्हवी नरेश चिचमलकर ९५.१७ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत जिल्ह्यातून प्रथम तर निधी पद्माकर कोरे ९४.५० टक्के, सुयश हेमराज बोरकर ९२.८३ टक्के घेत जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय ठरले. तर याच महाविद्यालयातील कला शाखेतील अनुराग रोशनलाल बोरकर याने ८९.५० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून द्वितीय व तालुक्यातून प्रथम क्रमांक गाठले आहे.
 

Saraswati 
 
Saraswati Junior College  सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण चार विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. यात केसर चंद्रशेखर मुंगुलमारे (९२.६७%) गुणांसह गुणवत्ताधारक ठरली. सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून एकूण १५२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत ३५ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ९१, द्वितीय श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच कला शाखेतून एकूण ७७ मुले परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यात प्राविण्य श्रेणीत ९, प्रथम श्रेणीत २७, द्वितीय श्रेणीत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी माध्यमिक शिक्षण मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियान व गुगल मीट द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले होते. असे असतानाही दरवर्षीप्रमाणे सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा जिल्ह्यातून प्रथम विद्यार्थी देण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा, सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया, प्राचार्य जे. डी. पठाण, उपप्राचार्या ए. ए. गुरनुले व पर्यवेक्षक एस. जी. राघोर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.