बारावीच्या निकालात वाशीम जिल्हा विभागात द्वितीय

-वाशीम जिल्ह्याचा निकाल ९२.१५ टक्के -मुलापेक्षा मुलींची सरशी

    दिनांक :02-May-2026
Total Views |
वाशीम,
12th result washim महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवार २ मे रोजी आभासी पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात वाशीम जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.१५ एवढी आहे. अमरावती विभागात वाशीम जिल्ह्याने द्वितीय स्थान पटकावले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुली निकालात मुलापेक्षा वरचढ ठरल्याचे निकालावरुन स्पष्ट होते. तर विविध शाखेच्या ५६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची टक्केवारी घसली आहे.
 

बारावीच्या निकाला 
 
 
वाशीम जिल्ह्यातून कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा व व्होकेशनल या शाखेतून एकूण २१ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरले. त्यात १२ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले तर १२३९६ विद्यार्थ्यांनी त्यापैकी २१ हजार २४० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात १९ हजार ३६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात ११०५४ मुलांचा तर ८३०७ मुलींचा समावेश आहे. मुलांची टक्केवारी ८९.१७ टक्के तर मुलींची टक्केवारी ९३.९२ एवढी आहे. जिल्ह्यातून प्राविण्य श्रेणीत २३४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, प्रथम श्रेणीत ६६३६ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. द्वितीय श्रेणीत ७८६४ विद्यार्थी तर पास श्रेणीत २५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
 
वाशीम जिल्ह्यातील सहा तालुक्यामधून मालेगाव तालुका निकालात अव्वल ठरला असून, निकालाची टक्केवारी ९२.१९८ एवढी आहे. वाशीम तालुक्याने द्वितीय स्थान पटकावले असून, त्याची टक्केवारी ९२.६६ एवढी आहे. रिसोड तालुका तिसर्‍या क्रमांकावर असून, त्याची टक्केवारी ९१.९९ एवढी आहे. कारंजा तालुक्याचा चवथा क्रमांक (९१.३४ टक्के), मंगरुळनाथ तालुका पाचवा (८८.५८) टक्के तर मानोरा तालुका निकालात (८४.८४ टक्के) सहाव्या स्थानावर आहे. वाशीम तालुक्यातून ५८५१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५८११ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात ५३८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्य श्रेणीत ७९५, प्रथम श्रेणीत २०८०, द्वितीय श्रेणीत २००९ तर पास श्रेणीत ५०१ विद्यार्थ्यांचा समोवश आहे. मालेगाव तालुक्यातून २५७६ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नामांकन भरले होते. त्यापैकी २५५१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. त्यापैकी २३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या विशेष प्राविण्य श्रेणीत १८२, प्रथम श्रेणीत ८३९, द्वितीय श्रेणीत १०७१, पास श्रेणीत २८० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातून ६१९४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यात ५६९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्य श्रेणीत १०१३, प्रथम श्रेणीत २०६५, द्वितीय श्रेणीत १९६३, पास श्रेणीत ६५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातून २४२६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यात २२१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्य श्रेणीत २५३, प्रथम श्रेणीत ६२२, द्वितीय श्रेणीत १०४८ तर पास श्रेणीत २९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
मंगरुळनाथ तालुक्यातून २०६८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी १८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्य श्रेणीत ७३, प्रथम श्रेणीत ६३३, द्वितीय श्रेणीत ८३४ तर पास श्रेणीत २९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातून २१९० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्य श्रेणीत २४, प्रथम श्रेणीत ३९७, द्वितीय श्रेणीत ९३९, तर पास श्रेणीत ४९८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
वाशीम जिल्ह्यातील विज्ञान, वाणिज्य, कला व व्हेकेशनल च्या ५६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, त्यात वाशीम तालुक्यातील १४, मालेगाव तालुक्यातील ८, रिसोड तालुक्यातील ११, कारंजा तालुक्यातील १०, मंगरुळनाथ तालुक्यातील ६, मानोरा तालुक्यातील ६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.12th result washim एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे कारंजा शहर व तालुका मागील काही वर्षापासून शिक्षणाच्या बाबतीत माघारले असून यंदाच्या निकालातही सहा तालुयातून कारंजा तालुका चवथ्या क्रमांकावर आहे. मानोरा तालुक्यातचा सर्वात कमी म्हणजे ८४.८४ टक्के तर मालेगाव तालुक्याचा सर्वाधिक ९२.९८ टक्के निकाल लागला. मागील वर्षी वाशीम जिल्ह्याचा निकालाची टक्केवार ९५.६६ एवढी होती. तर यावर्षी टक्केवारीत घसरण झाल्याचे निकालावरुन स्पष्ट होते.