शिवकालीन युद्धकला ही काळाची गरज : परसोडकर

    दिनांक :02-May-2026
Total Views |
क्रीडा भारतीच्या शिबिराचे उत्साहात उद्घाटन
 
वर्धा, 
क्रीडा भारतीच्या वतीने आयोजित ‘Sivakalin yudhakala’  शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ १ रोजी मुंडले परिसरात झाला. ऐतिहासिक वारसा जपणे आणि तरुण पिढीला शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे मत वर्धा नागरी बँकेचे उपाध्यक्ष मंगेश परसोडकर यांनी व्यत केले.
 
 
yudha
 
परसोडकर पुढे म्हणाले की, लाठी-काठी ही केवळ एक प्राचीन कला नसून ते स्वसंरक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. आजच्या काळात प्रत्येकाने, विशेषतः मुलींनी आणि तरुणांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अशा कलांमध्ये पारंगत होणे आवश्यक आहे. शिवकालीन युद्धकला ही शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवणारी असल्याचेही ते म्हणाले. तर शिबिराचे महत्त्व हरीश गांधी यांनी सांगितले. प्रस्ताविक योगेश केळकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय व क्रीडा भारतीची माहिती सारंग परिमल यांनी दिली.
शिबिरात स्वसंरक्षणाचे आधुनिक व पारंपरिक तंत्र. चपळता आणि मानसिक संतुलन वाढवण्यासाठी योग, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, बौद्धिक कार्यक्रम व व्यायाम यावर भर दिल्या जाणार आहे.
 
 
‘Sivakalin yudhakala’  शिबिराकरिता मुख्य प्रशिक्षक म्हणून अभिजित पारगावकर, प्रवीण खवशी, दिव्यांनी विरुळकर, साहिल तरळे तसेच क्रीडा भारतीचे कार्यकर्ते दीपाली हिंगणीकर, प्रणिता गुल्हाने, कविता कांबळे, सुहिला मशानाकर, अमितप्रसाद, संदीप आपटे, सुशील लोहिया, स्वप्नील पांडे परिश्रम घेतं आहेत.