हैदराबाद,
Speeding car accident kills 6 member हैदराबादमध्ये शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. शहरातील बाह्य वर्तुळ मार्गावर भरधाव धावणाऱ्या एका मोटारीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहन चालक माल बांधण्यासाठी थांबला असताना ही दुर्घटना घडली. त्याचवेळी वेगात येणाऱ्या मोटारीने अचानक नियंत्रण गमावले आणि ती थेट वाहनाला जाऊन धडकली. Speeding car accident kills 6 member धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, मोटारीचे मोठे नुकसान झाले आणि त्यातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. सर्वजण एकाच कुटुंबातील असून ते मंदिरदर्शन करून परत येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. Speeding car accident kills 6 member जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरला असून, स्थानिक नागरिकांनीही दुःख व्यक्त केले आहे. या अपघाताबाबत राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या असून, के. टी. रामाराव यांनी पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांना धीर दिला आहे. Speeding car accident kills 6 member पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.