आजोबांची भेट नियतीला मान्य नव्हती
संतप्त जमावाने एसटीच्या काचा फोडल्या
बाभुळगाव,
ST bus accident घाटंजी येथून पालोतीपर्यंतचा लांब पल्ला त्याने गाठला. मात्र आजोबांची भेट नियतीला मान्य नव्हती, आजोबाच्या घराजवळच नातवाचा एसटीच्या चाकात सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घाटंजी येथील रहिवासी साहील येबडवार (५ वर्षे) हा बाभुळगाव तालुक्यातील पालोती येथे आपल्या आजोबांना भेटण्यासाठी आईसोबत एसटी बसने आला. बसमधून उतरून बसच्या समोरून जात असताना बसच्या समोरच्या चाकात सापडून जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना शुक‘वारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या यवतमाळ धामणगाव रस्ता अडवून धरला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले व वाहतूक सुरळीत केली.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे घाटंजी येथील साहिल प्रमोद येबडवार हा त्याची आई आचल प्रमोद येबडवार (वय २६) ओम कडू चापले यांच्यासोबत घाटंजी वरून बाभुळगाव तालुक्यातील पालोती नांदुरा येथे आपल्या आजोबांच्या घरी येत होते. पालोती यवतमाळ आगाराची इलेक्ट्रिक बस क‘मांक एमएच४९ इन७९३६ थांबली असता तो आईसोबत बसमधून खाली उतरला व घरी जाऊ लागला. तेव्हा बस पुढे निघाली असता तो चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाला.
ST bus accident या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक दीपमाला सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक दीपक आसकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. एसटीचे नुकसान होऊ नये म्हणून अपघातग‘स्त बस वीरखेड, वाटखेड, नायगाव, मिटनापूरमार्गे पोलिस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी बस क‘मांक ४९बीझेड ७९३६ च्या चालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.