नागपूर,
Union Minister on health issues शहरातील शासकीय तसेच धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, पूर्व विदर्भच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात जामठा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, मेडिकल चौक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, बजरिया येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय तसेच मच्छी मार्केट समोरील धर्मादाय आयुक्त रुग्णालयातील रुग्णांच्या अडचणींचा उल्लेख करण्यात आला. Union Minister on health issues तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या योजनांमध्ये गरजू रुग्णांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाबही मांडण्यात आली.
ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळत नसल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. प्रत्येक रुग्णालयात योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ थेट गरजूंना मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रवीण शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. Union Minister on health issues यावेळी नेहा अंबादे, सचिन शर्मा, सुनील हातिथेले, शिल्पा रामेलवार, रमेश डोके, जगदीश गुप्ता, डॉ. वलिउन रहमान, डॉ. जयप्रकाश भार्गव, ॲड. अजय वांढरे, विनोद बाभुळकर, संजय गवई, निशांत वासानी यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गोरगरीब तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र