अट्टल चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

३ लाखाचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :02-May-2026
Total Views |
वाशीम,
thief, बस, रेल्वे प्रवाशांचे पैसे, मोबाइल व बॅग चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून ३ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
चोर
 
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रामदस तुकाराम सर्जेराव रा. पिंपळशेंडा ता. माालेगाव जि. वशीम याने तक्रार दिली की, ते मालेगाव येथून वाशीमकडे बस प्रवास करत असतांना अकोला नाका वाशीम येथे त्यांचे खिश्यातील २८,६०० रुपये कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेले. त्यावरुन वाशीम शहर पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच स्थागुशा चे पोनि प्रदीप परदेशी यांनी तपासकामी पथक तयार करुन शहर परिसरात रवाना केले. या पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी केली करुन आरोपीचा तपास लावला. मात्र, सदर आरोपी हा बाहेरगावी असल्याने तसेच तो वारंवार पत्ता बदलत असल्याने तपासकामात अडथळा येत होता. मात्र, १ मे रोजी आरोपी पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने वाशीम येथे आला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरुन आरोपीला अकोला नाका येथून सापळा रचून ताब्यात घेवून त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव राजकुमार कडु डोडे रा. नेपानगर जि. बुर्‍हाणपुर मध्यप्रदेश असे सांगीतले. त्याला पोलिसी खाया दाखवताच त्याने फिर्यादी रामदस तुकाराम सर्जेराव यांचे खिश्यातून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून अधिक माहिती घेतली असता त्याचेकडून रोख ९,५०० रुपये, विविध कंपन्याचे एकुण १३ मोबाईल किंमत अं. १ लाख ९५ हजार, सोने ३ ग्रॅम व १६ तोळे चांदी किंमत अं. ९५ हजार रुपये असा एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर आरोपीने नांदेड, भुसावळ, वाशीम येथे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि निलेश जाधव व त्यांच्या पथकाने केली.