मुंबई,
maharashtra hsc result 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वीचा (HSC) आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुली अव्वल ठरल्या आहेत. तर कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे. तर लातुर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. मुलींचा निकाल 93.15 टक्के आणि मुलांचा 86.80 टक्के निकाल लागला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागातील बारावीचा निकाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:
दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात:
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org
- hscresult.mahahsscboard.in
SMS द्वारे निकाल कसा पाहाल?
वेबसाइटवर ट्रॅफिक वाढल्यास सर्व्हर स्लो होऊ शकतो, अशा वेळी विद्यार्थी एसएमएसद्वारे त्वरित निकाल मिळवू शकतात:
१. मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.
२. MHHSC [space] आसन क्रमांक टाइप करा.
३. हा मेसेज ५७७६६ या क्रमांकावर पाठवा.
निकाल कसा डाउनलोड करायचा? (Step-by-Step)
१. वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा आसन क्रमांक (Seat No.) आणि आईचे नाव अचूक भरा.
४. 'View Result' बटणावर क्लिक करा.
५. स्क्रीनवर निकाल दिसताच त्याची प्रिंटआउट घ्या किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करा.
-विद्यार्थी 'DigiLocker' वरूनही आपली डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात.
परीक्षेचा थोडक्यात आढावा:
परीक्षा कालावधी: ११ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६.
निकाल पद्धत: उत्तरपत्रिकांची वेळेत छाननी करून मंडळाने जलदगतीने निकाल तयार केला आहे.
मागील वर्षाचा कल: २०२५ मध्ये राज्याचा एकूण निकाल ९१.८८% लागला होता. यामध्ये मुलींनी (९४.५४%) मुलांपेक्षा (८९.५१%) बाजी मारली होती.
पुनर्परीक्षा :
जे विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, त्यांच्यासाठी बोर्डाकडून तातडीने जुलै-ऑगस्टमध्ये पुनर्परीक्षा घेतली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांना पुढील प्रवेशासाठी संधी मिळेल.
घेता येईल.
जिल्ह्या टक्केवारी पुढील प्रमाणे
कोकण विभागाचा उत्तीर्ण टक्का सर्वात जास्त ९४.१४% आहे आणि त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.
लातूर विभागाचा उत्तीर्ण टक्का सर्वात कमी ८४.१४% आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यंदाही मुलीच अव्वल. मुलींचा निकाल 93.15 टक्के आणि मुलांचा 86.80 टक्के निकाल लागला आहे
१) पुणे ९१.२५%
२) नागपूर ८८.६७%
३) छत्रपती संभाजीनगर ८८.६८%
४) मुंबई ९०.०८%
५) कोल्हापूर ८९.९७%
६) अमरावती ९०.९२%
७)अकोला - ९ ०.१ ४ %
८) बुलढाणा - ९५ .२ २ %
९) वाशीम - ९१.15 %
१ ०) यवतमाळ - ८९ .६९ %
१ १) नाशिक ९०.७२%
१ २) लातूर ८४.१४%
१ ३) कोकण ९४.१४%