रामदासजींसारखे हजारो कार्यकर्ते तयार व्हावेत

नितीन गडकरी यांची भावना

    दिनांक :02-May-2026
Total Views |
रामदास आंबेटकर यांचा कार्यअहवाल प्रकाशन
नागपूर,
Ramdasji रामदास आंबटकर यांच्यासारखे हजारो कार्यकर्ते तयार व्हावेत, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केली. दिवंगत रामदास आंबटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कार्यअहवाल प्रकाशन व श्रद्धांजली सभा आज सायंकाळी झाली. नितीन गडकरी यांच्यासह रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, अ. भा. विद्यार्थी परिषदेचे अ.भा. सहसंघटक देवदत्त जोशी, भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, गीता आंबटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Ramdasji
नितीनजी गडकरींसह उपस्थित सवारंनीच रामदास आंबटकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नितीनजी म्हणाले की, ‘जे काम दिले ते मी करीन’, या निस्पृह, नि...स्वार्थ, समर्पित भावनेने रामदास आंबटकर यांनी काम केले. भरपूर प्रवास करीत संघटना बांधणी केली. उत्तम स्वयंसेवक व उत्तम कार्यकर्ता हीच त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडले, अनेक कार्यकर्ते सांभाळले. प्रत्यक्षात हे काम कठीण असते. Ramdasji प्रतिकुल काळात त्यांनी काम केले. फळाची अपेक्षा न करता त्यांनी काम केले. त्यांच्यासारखे हजारो कार्यकर्तेर् निर्माण व्हावेत, असे नितीनजी म्हणाले. आजनसरा येथे लवकरच भगवानजी आंबटकर स्मृती पूल तसेच दत्ता मेघे स्मृती धर्मशाळा व अन्नछत्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल मोघे यांनीही रामदासजींच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, रामदासजी कार्यकर्ता, गीत गायक, संघटक होेते. कार्यकर्ता म्हणून जे-जे गुण आवश्यक आहेत ते सर्व आत्मसात करणे, वेळ येईल तेव्हा त्याचे प्रदर्शन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आज अनुकूल काळात काम उभे करण्यासाठी अनेक कार्यकर्ते खपले, त्यापैकी रामदासजी आहेत.
ते अव्याहत प्रवास करायचे. कार्यकत्यारच्या जिवंत संपर्कामुळेच आजचे चांगले दिवस आले आहेत. संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कशी वागणूक असावी, हा त्यांचा आदर्श ठेवून काम करण्याची गरज आहे, याकडे मोघे यांनी लक्ष वेधले. डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले की, अभाविपचे कार्य उभे झाले त्यात रामदासजींचा सिंहाचा वाटा आहे. देवदत्त जोशी म्हणाले की, कार्यकर्ता हा माणूस आहे, या विचाराने रामदासजींनी काम केले. Ramdasji मनाचा डॉक्टर म्हणून काम केले. गीता आंबटकर म्हणाल्या की, सेवाकार्य हा त्यांचा वसा होता. त्यांनी भरपूर प्रवास केला. विविध जबाबदाèया सांभाळल्या. समाजकार्याचा वसा शेवटपयरत जपला. हा कार्यअहवाल तयार करणारे सुनील कुहीकर, सुनील राजे, संजय येलुरे, निशिकांत देशपांडे, मनीषा कुळकर्णी, विवेक कवठेकर, प्रकाशक उन्मेश धोटे यांच्याप्रति कृतज्ञता व्ये केली. प्रारंभी दयाशंकर तिवारी यांनी प्रास्ताविक केले.