वरूड व अमरावतीत वादळी पाऊस

    दिनांक :02-May-2026
Total Views |
वरूड/अमरावती, 
Thunderstorms in Warud and Amravati वरूड व शे.घाट शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवारात दिवसभराच्या अती तापमानानंतर साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक वादळाने कहर केला. दुकानाचे फलक, रस्त्यावरील फेरीवाल्यांचे साहित्य, काही ठिकाणी टिनाचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे हवेची गती वाढल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
 
 
pakus
 
Thunderstorms in Warud and Amravati  या वादळामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने दोन्ही शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. शे.घामध्ये सुद्धा वादळी वार्‍यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. अमरावती शहरात पावणे सात वाजता वादळी पाऊस आला. पावसामुळे हवेत थंडावा पसरला. त्यामुळे नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना थंड हवेचा आनंद घेता आला.