वणी व राळेगावात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पाळला ‘काळा दिवस’

    दिनांक :02-May-2026
Total Views |
वणी/राळेगाव, 
Vidarbha state agitation in Wani and Ralegaon महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने राळेगाव व वणी येथे वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देऊन विदर्भासाठी ‘काळा पाळला. राळेगाव येथे आंदोलनात समितीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, अक्षय महाजन, गोपाल भोयर बोरी (ई) चौकात आंदोलन करून वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देऊन विदर्भासाठी काळा दिवस म्हणून पाळला. आंदोलकांनी बोरी (ई) वरून वडकी येथे मुख्य महामार्गाने मोटर सायकल रॅली काढून घोषणाबाजी केली.
 
 
kala
 
यावेळी आशिष निम‘ड, गिरीश तुरके, भास्कर पाटील, नीलेश दशरथ काळे, प्रदीप भोयर, मोहन आवारी, घर्षण गेम, संकेत वेरुळकर, दशरथ ठोंबरे, जीवन तोडाशे अखिल आवारी सहभागी झाले होते. वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, कुपोषण, अपुरी सिंचन व्यवस्था, उद्योगांचा अभाव तसेच वीज दरवाढ या प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. न्याय द्या, स्वतंत्र विदर्भ राज्य द्या, महाराष्ट्रदिनाचा निषेध असो या घोषणांनी परिसर दणाणला.
 
 
Vidarbha state agitation in Wani and Ralegaon  या प्रसंगी प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, अ‍ॅड. राहुल खारकर, बाळासाहेब राजुरकर, देवराव धांडे, अजय धोबे, अमित उपाध्ये, नामदेव जनेकर, संजय चिंचोळकर, विकेश पानघाटे, पुंडलिक पथाडे, अशोक चौधरी, विभी टोंगे, गजेंद्र भोयर, प्रभाकर उईके, होमदेव कन्नाके, हेपट, कृष्णदेव विधाते, काशिनाथ जेउरकर यांच्यासह विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.