उंबर्डा बाजार,
wildlife sanctuary dry up कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणार्या सोमठाणा व उंबर्डा बाजार परिक्षेत्रात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी तडफड पाहावयास मिळत आहे. वन विभाग व वन्यजीव क्षेत्रातील अनेक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे याच प्राण्यांचा वावर मानव वस्तीत वाढला असून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्यजीव विभाग मात्र कोणत्याच प्रकारची तसदी घेत नसल्याचे दिसत आहे. वन्यजीव व वन विभाग पाणवट्यामध्ये पाणी सोडून वन्य प्राणी व पक्षी यांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी प्राणी प्रेमी कडून केली जात आहे.
उंबर्डा बाजार, सोमठाणा परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. यामध्ये वन्यप्राणी, पक्षी ही मोठ्या प्रमाणात आहेत. सोमठाणा वनक्षेत्र बीटच्या हातपंप असलेल्या दोन पाणवठ्या सह इतर १६ पाणवठ्यात पाणी सोडले जात नसून पाण्याचा ठणठणाट दिसत आहे. वन्य प्राण्यांना पिण्यास पाणीच नसल्याने त्याचा वावर मानव वस्तीत वाढलेला आहे. गावालगत असलेल्य वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरस, लांडगे, कोल्हे, हरीण, सायाळ, ससे यांच्यासह अन्य प्राणी आहेत. तर चिमणी, मोर, लांडोर, कावळा, घार, चित्तूर यांना पिण्यास पाणी नाही. याकडे कोणीच लक्ष देत नसून रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन्यजीव व वनविभागाला बुक्का लावणारे अधिकारी अन् कर्मचारी आपल्याच धुंदीत आहेत. कारंजा सोहळ अभयारण्याचे कार्यालय हाके च्या अंतरावर असतांना सुद्धा वनपाल, वनरक्षक व वनमजूर वनविभाग कार्यक्षेत्रात कोण आहेत? हेच जनतेला माहीत नाही. फॉरेस्टमध्ये अनेक ठिकाणी झाडे तोडलेले बुडे अन् जळलेली झाडे पहावयास मिळत आहेत.
वन्य प्राण्यांचे पाणवठे नावालाच आहेत. येथील पाणवठे कायमचे कोरडे असतात. हे वनमजूर, वनरक्षकाला माहीत आहे. त्यामुळे सध्या ज्या ठिकाणी ही यंत्रणा आहे, ती निरुपयोगी ठरत आहे. हे वनपरिक्षेत्र अधिकार्याला माहीत नाही का? अशा या गोष्टी हे करीत नसतील तर फॉरेस्ट हे काय राखणार, असा सवाल जनता उपस्थित करीत आहे. सोमठाणा व उंबर्डा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्र आहे. वनरक्षकासह वन मजुरांच्या नेमणुका आहेत. पण हे कोठे असतात, हे समजत नाही. सध्या कडक ऊन यामुळे उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे.wildlife sanctuary dry up अक्षरश: चिमणीस पिण्यासही पाणी नाही. येथे फॉरेस्टमधील पाणवठ्यांची अवस्था तर न पाहवणारी अशीच आहे. पण कर्तव्याची जाण नसलेला हा वन्यजीव विभाग मनमानी प्काम करीत आहे.