Water Resources Project जलसंपदा विभागाच्या निष्क्रियता, ढिसाळ नियोजन व पूर्णपणे बेजबाबदार कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी अक्षरशः होरपळत आहेत. शेती खरेदी-विक्री, बक्षीसपत्र मृत्युपत्र नोंदणीसाठी लाभ क्षेत्राचा दाखला बंधनकारक करताना तो केवळ आपले सरकार या ऑनलाइन पोर्टलवरूनच घेण्याची सक्ती लादण्यात आली आहे. मात्र पोर्टलवर आवश्यक माहिती व मार्गदर्शन नसल्याने व्यवहार अक्षरशः ठप्प झाले आहेत.
कोणते गाव कोणत्या जलसंपदा प्रकल्पात येते, डाव्या की उजव्या कालव्यात समाविष्ट आहे, याबाबत पोर्टलवर कोणतीही अधिकृत माहिती नाही. बाब म्हणजे, विभागातील अनेक अधिकारी व कर्मचार्यांनाच त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाव-प्रकल्प नकाशा माहित नसल्याचे उघड झाले. आभासी अर्ज केल्यानंतर १५—ते २० दिवस कोणतीही हालचाल नाही. त्यानंतर इतर प्रकल्प निवडा असा एका ओळीतला शेरा देत अर्ज नाकारला जातो. योग्य प्रकल्प कोणता, याचे साधे मार्गदर्शनही दिले जात नाही. यामुळे वेळ, पैसा व वाया जात आहे.
Water Resources Project मुलीच्या लग्नासाठी, दवाखान्याच्या खर्चासाठी किंवा तातडीच्या गरजेसाठी शेती व्यवहार करायचा असताना हा दाखला अडथळा ठरत आहे. मदत करण्याऐवजी यंत्रणा अडथळे निर्माण करत असल्याने शेतकर्यांमध्ये तीव‘ संताप उसळला आहे. यवतमाळ व आर्णी येथील अधिकार्यांशी अनेकदा चर्चा करूनही ठोस माहिती किंवा उपाय मिळाला नाही. उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात शेतकर्यांना उंबरठे झिजवावे लागत आहेतही परिस्थिती संतापजनक आहे.