जिल्ह्याचा निकाल 89.69 टक्के
यवतमाळ,
Yavatmal: 12th exam results महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार, 2 मे रोजी जाहिर करण्यात आला. यात यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 89.69 टक्के लागला आहे. जाहीर झालेल्या या निकालात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुलींनीच बाजी मारली आहे.
(संग्रहित छायाचित्र )
अमरावती विभागात इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याची घसरण कायम असून जिल्ह्याला पुन्हा 4 थ्याच क्रमांकावर समाधान मानावे लागले. या निकालात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.41 असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.33 एवढी आहे.
Yavatmal: 12th exam results जिल्ह्यात उमरखेड तालुक्याने निकालात आघाडी घेत 95.94 टक्यांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. राळेगाव तालुक्याला 73.80 टक्यांसह शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. तर यवतमाळ तालुक्याचा निकाल 91.86 टक्के, दारव्हा 92.44 टक्के, दिग्रस 88.02 टक्के, पुसद 95.53 टक्के, महागाव 95.80 टक्के, आर्णी 94.49 टक्के, घाटंजी 88.64 टक्के, पांढरकवडा 77.93 टक्के, झरीजामणी 84.97 टक्के, वणी 75.21 टक्के, मारेगाव 75.55 टक्के, कळंब 78.17 टक्के, बाभुळगाव 95.86 टक्के तर नेर तालुक्याचा बारावीचा निकाल 89.75 टक्के लागला आहे. बारावी 2025-26 परिक्षेसाठी जिल्ह्यातून 33 हजार 745 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 33 हजार 436 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी 29 हजार 989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसèयांदा परीक्षा देणाèयांची संख्या 1 हजार 732 होती. त्यापैकी 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.