अंजनगाव बाजार समिती संचालक मंडळाला दिलासा

    दिनांक :20-May-2026
Total Views |
अपात्रतेला मंत्रालयाकडून स्थगिती
 
अंजनगाव सुर्जी, 
Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समिती, अंजनगाव सुर्जी येथील १७ संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र घोषित केले होते. त्या आदेशाला राज्याच्या पणन मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. १९ मे रोजी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी हा स्थगिती आदेश दिल्याने संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे. २४ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम २०१७ च्या १०(१) (आय) नुसार अंजनगाव सुर्जी बाजार समितीच्या सर्व १७ संचालकांना अपात्र घोषित केले होते. या कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती, तर भाजपच्या सहकारातील सत्तेला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती.
 
 
anjan gav
 
Agricultural Produce Market Committee  विरोधकांनी पुढील कायदेशीर पावले उचलत विभागीय सहनिबंधक कार्यालयात कॅव्हेट दाखल केले होते. मात्र, सभापती अ‍ॅड. जयंत साबळे यांनी थेट मंत्रालय स्तरावर अपात्रतेच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले. ८ मे रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी अर्जदार संचालक, जिल्हा उपनिबंधक, तसेच शरद साबळे, विनायक वाघ, सुधीर अढाऊ या प्रतिवादींना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पणन मंत्र्यांनी १९ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली. आदेशात जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर ताशेरेही ओढण्यात आले
 
सत्याचाच विजय होईल
आमच्या संचालक मंडळाने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक विक्रमी बचत करत बाजार समितीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. समितीच्या उत्पन्न वाढीसोबत अनेक विकासाची महत्त्वाची कामेही पूर्ण केली. पुढील कार्यकाळातील विकासात्मक कामाचे नियोजनही तयार आहे. समितीची होत असलेली प्रगती विरोधकांना बघवली नाही. त्यामुळेच त्यांनी थेट विरोध न करता, राजकीय दबावाखाली आणि धनदांडग्यांचे हस्तक बनून न्यायालयात खोटे दावे दाखल केले. विकासाला खोडा घालण्याचाच हा डाव आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. निकाल आमच्या बाजुने लागेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
 
अ‍ॅड. जयंत साबळे
सभापती कृ.ऊ.बा.समीती, अंजनगाव सुर्जी