वांद्र्यात बुलडोझर कारवाई, दगडफेक, पोलिसांचा लठीचार्ज, धरपकड

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुंबई
Bandra demolition drive पश्चिम रेल्वेकडून वांद्रे रेल्वे परिसरातील गरीब नगर झोपडपट्टी भागात न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला
 

Bandra demolition drive, Mumbai slum eviction protest, Western Railway encroachment removal, Bandra slum bulldozer action, 
पश्चिम रेल्वेकडून संबंधित परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पथक दाखल झाल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या फेकल्याची घटना घडली. या प्रकारानंतर परिस्थिती अधिक चिघळत गेली आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही काही काळ परिसरात तणाव कायम राहिला. या दरम्यान दगडफेक करणाऱ्या काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही समजते.
 
 
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेवरून Bandra demolition drive स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे. अनेक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप करत नागरिकांनी कारवाईला विरोध दर्शवला. प्रशासनाकडून मात्र ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नियमानुसारच सुरू असल्याचे सांगितले जात आहे.घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कारवाई आणि परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.