रविवारी दिल्लीत जनजाती संस्कृती समागम

    दिनांक :20-May-2026
Total Views |
-देशभरातील लाखो जनजाती बंधू-भगिनी जाणार
 
नागपूर, 
Birsa Munda Jayanti महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, नवी दिल्लीतील लाल किल्ला मैदानात रविवारी 24 मेे रोजी जनजाती सांस्कृतिक समागम आयोजित केला असल्याची माहिती विदर्भ जनजाती सुरक्षा मंचचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्र संयोजक विनायक सुरतने, विदर्भ प्रांत संयोजक रमेश मावस्कर, वनवासी कल्याण आश्रमाचे विदर्भ उपाध्यक्ष डॉ. रामदास आत्राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
 
Birsa Munda Jayanti
 
त्यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शाह यांनी या जनसभेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. भगवान बिरसा मुंडा हे भारताचे स्वातंत्र्य, सांस्कृतिक अस्मिता व सामुदायिक चेतनेचे प्रतीक आहेत. हे एक ऐतिहासिक राष्ट्रीय आयोजन असून देशभरातील पाचशेहून अधिक जनजातींचे दीड लाख बंधू-भगिनी स्वखर्चाने होतील, हे त्यांनी स्पष्ट केले. जनजाती संस्कृती समागम 2026 एक अत्यंत भव्य सांस्कृतिक आयोजन आहे. आपल्या धर्म, संस्कृती व परंपरांबद्दल जागरूकता घेऊन जनजाती प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने देशाच्या राजधानीत एकत्र येत आहेत.
 
 
भव्य सांस्कृतिक शोभायात्रा हे मुख्य आकर्षण. देशाच्या विविध भागांतून पारंपरिक वेशभूषेत आलेले जनजाती बंधू-भगिनी आपल्या थोर सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतील. ही शोभायात्रा पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून निघेल, जी परंपरा व सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असेल. सर्व यात्रांचा शेवट लाल किल्ल्यावर होईल. त्यानंतर भव्य जनसभा आहे. ‘तू-मै एक रक्त - वनवासी, ग्रामवासी, नगरवासी, आपण सर्व भारतवासी’ हा या सांस्कृतिक समागमाचा मुख्य विचार असेल. भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शांचे स्मरण, जनजातींच्या समृद्ध सांस्कृतिक, गौरवशाली परंपरांचा गौरव, सांस्कृतिक आदानप्रदान व संवादासाठी राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणे, सामाजिक समरसतेची भावना बळकट करणे हे प्रमुख उद्देश आहेत.
 
 
Birsa Munda Jayanti यानिमिताने दुर्गम वन, पर्वतीय भागात राहणाèया आपल्या वनवासी बांधवांना भेटण्याची व त्यांचे स्वागत करण्याची संधी दिल्लीकरांना प्रथमच मिळत आहे. विविध राज्यांतून मोठ्या संख्येने येणाèया जनजाती बांधवांच्या सर्व सोयी-सुविधांसाठी दिल्लीतील नागरिक सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. यासाठी 20 विभागांची स्थापना करण्यात आली असून विविध समित्याही तयार करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील कार्यकर्त्यांनी निवास, अन्न-पाणी, वाहतूक वैद्यकीय सेवा, सुरक्षा व स्वच्छता आदी व्यवस्था केली आहे. नीता सुनील किटकरू पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या.