मोटेगावकर क्लासेसची मालमत्ता सील करण्याचे आदेश

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे
Motegavkar classes पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात भोगवटा पत्र नसलेल्या अनधिकृत इमारतीमध्ये चार वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेस’वर महापालिकेने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या इमारतीवर सुमारे ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकतकर आकारण्यात आला असून संबंधित मालमत्ता सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 

Motegavkar classes  
मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील या इमारतीत गेल्या चार वर्षांपासून ‘मोटेगावकर क्लासेस’ चालवले जात होते. मात्र या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संबुस यांनी २३ मार्च रोजी पुणे महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर मिळकतकर विभागाने संबंधित मालमत्तेवर तिप्पट दंड लावत ३.२० कोटी रुपयांचा कर आकारला. मात्र, बांधकाम विभागाकडून कारवाई करण्यात विलंब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.दरम्यान, नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातही या क्लासेसच्या प्रमुखाचा सहभाग असल्याचे आरोप होत असून या पार्श्वभूमीवर प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिका Motegavkar classes  भवनात आंदोलन केले. यावेळी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर रामयांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.या भेटीदरम्यान आयुक्तांनी संबंधित इमारत तातडीने सील करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुणे महापालिकेची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.